Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’च्या भाषिक अल्पसंख्याक विभागाचा मेळावा


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाषिक अल्पसंख्याक विभागाचा पहिला मेळावा येथील प्रदेश कार्यालयात उत्साहात पार पडला. भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा घेण्यात आला. यामध्ये गुजराथी, सिंधी, साऊथ इंडियन हे सेल सहभागी झाले होते. अल्पसंख्यांक विभागाने भाषिक अल्पसंख्यांकांचा जनाधार राष्ट्रवादीकडे वळविण्याचा संकल्प या वेळी केला.



सुरुवातीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या मेळाव्यात पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शहिद जवानांच्या कुटुंबियांना काही मदत जमा करण्यात आली.



या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, भाषिक अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुकेश गांधी, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, साउथ इंडियन सेलचे अध्यक्ष सुंदर नायडू, गुजराती सेलच्या अध्यक्षा दीपाली दलाल, मुंबई गुजराती सेल अध्यक्ष मुकेश सोनी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZMRBX
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
‘राष्ट्रवादी’तर्फे लोकसभेचे आणखी पाच उमेदवार जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी पहिली १२ उमेदवारांची यादी १४ मार्च २०१९ रोजी यादी जाहीर केल्यानंतर १५ मार्चला आणखी पाच उमेवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मुंबई : पहिल्या आद्यशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जंयती राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये तीन जानेवारी २०१९ रोजी साजरी करण्यात आली.
‘व्यसनाधीन पिढी समाजाला हानिकारक’ मुंबई : ‘दारू पिणे हा आज एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पुढे येऊ लागला आहे. व्यसनाधीन झालेली ही पिढी हिंसाचाराला निमंत्रण देत असून, समाजाच्या स्वास्थ्याला हानिकारक होत चालली आहे,’ अशी खंत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language